Nagpur Rain Update: नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, ठिकठिकाणी झाडे कोसळली | पुढारी

Nagpur Rain Update: नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, ठिकठिकाणी झाडे कोसळली

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: आज दुपारी चारच्या सुमारास नागपुरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. यामुळे काही काळ गारवा तर नंतर प्रचंड उकाडा जाणवला. शहरात एकीकडे कडक ऊन तर दुसरीकडे जोरदार पाऊस असे विचित्र वातावरण पाहायला मिळत होते. सध्या पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे. आज दुपारनंतर तसेच सायंकाळी नागपुरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

विदर्भात प्रचंड तापमान

विदर्भात तापमान सध्या सर्वाधिक 41-42. अंश से. च्या आसपास आहे. हवामान विभागाने चार दिवस नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. सिव्हील लाईन्स, राजभवन, काटोल रोड,कोराडी रोड अशा काही भागात पावसाच्या सरीनी उकाडा वाढविला. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आकडेवारीनुसार, तापमान कमी असले तरी रोज दुपारी 12 नंतर उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. ढगाळ वातावरण, पावसाच्या हजेरीने विदर्भात मे अखेरीस तापमान कमी झाल्याचे अनुभवास येत आहे.

 

हेही वाचा

Back to top button