नागपूर: पेठ मुक्ताईपूर येथील १४७ जणांना गॅस्ट्रोची लागण | पुढारी

नागपूर: पेठ मुक्ताईपूर येथील १४७ जणांना गॅस्ट्रोची लागण

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नरखेड तालुक्यातील पेठ मुक्ताईपूर येथील १४७ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. गेल्या दोन दिवसांपासून रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे एकापाठोपाठ एक रुग्ण रविवारपासून दाखल होत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. पेठ मुक्ताईपुर गाव गॅस्ट्रोच्या विळख्यात सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत.

रुग्णांवर उपचार सुरू असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button