

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी यवतमाळ शहराजवळील माळमासोळी येथे घडली. निखिल विजयराव काकडे (वय २१, रा. देवधरी ता. घाटंजी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
निखिल धामणगाव मार्गावरील कॉलेजमध्ये बीएसडब्ल्यू पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. निखिलचे यवतमाळमध्ये वास्तव्य होते. रविवारी सुटी असल्याने तो मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेला. तेथे अंदाज चुकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी अशीच घटना कापरा तलावात घडली. तेथे पॉलिटेक्निकच्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.
हेही वाचा