यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पैशासाठी विळ्याने वार करून मुलाने आईची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १०) कळंब तालुक्यातील हिवरादरणे येथे घडली. बेबीबाई अशोक चाडगे (५६, रा. हिवरादरणे), असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा नितीन अशोक चाडगे (३५, रा. हिवरा दरणे) याला कळंब पोलिसांनी अटक केली.