Chandrapur Car Accident : कार अपघातात नागपूरचे ड्रग्ज इन्सपेक्टर ठार; पत्नी जखमी | पुढारी

Chandrapur Car Accident : कार अपघातात नागपूरचे ड्रग्ज इन्सपेक्टर ठार; पत्नी जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर वरून नागभीडमार्गे नागपूरला जाणाऱ्या कारचा चिंधीमाल फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघात नागपूर येथील ड्रग्ज इन्सपेक्टर ठार झाले. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला. चंद्रमनी डागे (वय ५०) असे मृतकाचे नाव आहे. (Chandrapur Car Accident)

नागपूर येथील निवासी ड्रग्ज इन्सपेक्टर चंद्रमणी डांगे हे चंद्रपूरला (वा.क्र.एम.एच.४०,एक्स.सी.३०८३) या कारने पत्नीसह गेले होते. शुक्रवारी दुपारी चंद्रपूर वरून मूल, नागभीड मार्गे नागपूरला निघाले होते. तळोधी ते नागभीड मार्गावरील चिंधीमाल गावाजवळ सायंकाळी पाच वाजताचे सुमारास भरधाव असलेल्या कारवरील चंद्रमणी डांगे यांचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. (Chandrapur Car Accident)

या अपघातात चंद्रमणी डांगे व पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान चंद्रमणी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी उपचार सुरु आहेत. धडक इतकी भीषण होती की कारचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पोलिस व नागरिकांनी घटनास्थळी येऊन जखमींना रूग्णालयात हलवले. मृतक डांगे हे नागपूरात ड्रग्ज इन्सपेक्टर म्हणून कार्यरत होते.

अधिक वाचा : 

Back to top button