नागपूर: उन्हाचा तडाखा, प्राण्यांसाठी महाराजबाग प्राणीसंग्रहालयात विशेष व्यवस्था | पुढारी

नागपूर: उन्हाचा तडाखा, प्राण्यांसाठी महाराजबाग प्राणीसंग्रहालयात विशेष व्यवस्था

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ संचालित महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनातर्फे वाढत्या उष्णतेपासून प्राण्यांना वाचवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

उष्णतेच्या प्रकोपामुळे माणसांबरोबरच प्राण्यांना देखील त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाकडून प्राण्यांचा उन्हापासून बचाव होण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरात सुमारे 43 ते 44 अंश सेल्सिअस तापमानामुळे तीव्र उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. या उष्णतेमुळे माणसांबरोबरच प्राण्यांचेही हाल होत आहेत.

महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये एअर कुलर, कारंजे, जलाशयाची व्यवस्था केली आहे. यासोबतच सूर्याची थेट किरणे प्राण्यांवर पडू नयेत, म्हणून पिंजऱ्यांवर हिरवी जाळीही टाकण्यात आली आहे. हरिण आणि नीलगाय यांना रसदार फळे दिली जात आहेत. जेणेकरुन या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमी करता येईल, अशी माहिती डॉ. अभिजित मोटघरे यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button