अकोला दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस ऑन अलर्ट मोडवर! | पुढारी

अकोला दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस ऑन अलर्ट मोडवर!

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मेसेजच्या निमित्ताने झालेल्या अकोलामधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीसही अलर्ट मोडवर आहेत. याबाबतची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सोमवारी (दि.१५) रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शहरातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आवश्यक काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून सोशल मीडियावर पोलिसांची नजर असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी सांगितले. सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह मेसेज दिसल्यास ते लगेच डिलीट करण्याची प्रक्रिया केली जात आहे.

तसेच विविध धर्मीय नेत्यांशी पोलीस अधिकारी संपर्कात असून तूर्तास नागपूर, कामठी परिसरात कुठेही अडचण नाही. अशाही स्थितीत कुठलेही अनैतिक घटना घडल्यास ती हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button