नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमान 45.5 अ. से. नोंदविण्यात आले. नागपूरला या मोसमातील सर्वाधिक तापमानाची 44.3 नोंद झाली. एकंदरीत विदर्भात नवतपापूर्वीच उन्हाचा तडाखा वाढला आहे. आज विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाचा विचार करता अकोला नंतर अमरावती (45.4), वर्धा (44.9), यवतमाळ (43.5), नागपूर (44.3), चंद्रपूर (43.2), गोंदिया, (42.5), गडचिरोली (41.8), बुलडाणा (40.8) याप्रमाणे तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती पाठोपाठ आता नागपूरचे तापमान झपाट्याने वाढत आहे.