देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर; भाबडेपणाचा मुखवटा उतरवा! | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर; भाबडेपणाचा मुखवटा उतरवा!

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आरोप केला. त्यांनी ‘राज्यातील जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारून शिवसेनेला वरपास केले होते. शिवसेनेने भाजपासोबत युतीमध्ये लढवलेल्या जांगापैकी केवळ ४५ टक्के जागा निवडून आल्या तर भाजपाच्या ७० टक्के जागा निवडून आल्या. त्यामुळे जनतेच्या मतांशी बेईमानी करून शिवसेनेने सत्ता मिळविली.’ असे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दसर्‍या मेळाव्यातील भाषणाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवून हे मान्य करावे की मुख्यमंत्री होण्याची तूमची महत्वाकांक्षा होती ती पुर्ण झाली. राजकारणात महत्वाकांक्षी असणे चुकीचे नाही परंतू ती लपवून त्याआड तत्वज्ञान सांगणे हे चुकीचे आहे असा टोला त्यांनी लगावला.

तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आले असते : देवेंद्र फडणवीस

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिलाच होता तर मग शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आले असते. दिवाकरराव रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का केले नाही? नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिवसेनेतून का बाहेर पडले? असा खोचक सवालही फडणवीसांनी केला. तुमची महत्वाकांक्षा होती ती पुर्ण झाली त्यामुळे आता आम्हाला दोष देणे बंद करा. दोन वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात. तेच ते किती दिवस सांगणार? असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला. त्यामुळे कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ना विचार होते ना सोनं होतं. केवळ आणि केवळ त्यांच्या भाषणात निराशा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारचा खंडणीचा अजेंडा : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात ज्या सरकारचं नेतृत्व उध्दव ठाकरे करतायत ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारची नोंद इतिहासात होईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा खंडणी हा एकच अजेंडा असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून राज्यात ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांनी तपास सुरू केला आहे. या एजंसी आम्ही आणल्या नाहित असेही ते म्हणाले.

हेही वाचा : चप्पल, बूटसह गरबा खेळण्यास मनाई केली म्हणून मंडपावर सामुहिक हल्ला

काही मंत्र्यांकडे वसूलीचे सॉफ्टवेअर : देवेंद्र फडणवीस

राज्यात आयटी च्या प्रमुखांनी सांगितलेल्या माहिती नंतर तर राज्याच्या प्रमुखाला झोपच यायला नको. राज्यात दलाली एवढी वाढली आहे की त्याचं पुढचं स्वरूप म्हणजे वसूलीचे सॉफ्टवेअर आहे. राज्यात झालेल्या ईडी आणि सीबीआय च्या कारवाईतून असे लक्षात आले आहे की राज्यातील काही मंत्र्यांकडे वसूलीचे सॉफ्टवेअर आहे. त्यातून कोणाकडून किती वसूली करायची याचा ताळेबंद घेतला जातो. असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. त्यामुळे राज्यात ईडी सीबीआय सारख्या संस्था येणार आहे असे फडणवीस म्हणाले.

तर अर्धे मंत्रीमंडळ जेलमध्ये

पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे ईडी आणि सीबीआय सारख्या एजंसी चा वापर करण्याच्या विरोधात आहे. ते एजंसीचा गैरवापर करूही देत नाही आणि त्यांच्या चौकशीच्या मध्येही येत नाही. या एजंसीचा वापर केला असता तर राज्याचे अर्धे मंत्रीमंडळ जेलमध्ये असते असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : रामदास आठवले म्हणतात; आरपीआय ऐक्याचा विषय आता संपला

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचे मनसुबे कालच्या भाषणात बोलून दाखविले. काही पक्षांना घेऊन संविधान बदलण्याची भाषा करण्यात येत आहे. मात्र हे संविधान बदलण्याचे मनसूबे आम्ही पुर्ण होऊ देणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच महाराष्ट्राचा बंगाल ही आम्ही होऊ देणार नाही असे फडणवीस म्हणाले.

Back to top button