चप्पल, बूटसह गरबा खेळण्यास मनाई केली म्हणून मंडपावर सामुहिक हल्ला | पुढारी

चप्पल, बूटसह गरबा खेळण्यास मनाई केली म्हणून मंडपावर सामुहिक हल्ला

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

मंडपात बुट, चप्पल घालून गरबा खेळण्यास हटकल्यावरून धडगाव येथे एका जमावाने दुर्गा देवीच्या मंडपाची नासधूस केली. तसेच सळईने वार करून एकाला गंभीर जखमी केले. धडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

धनाजे बु गावी जिल्हा परिषद शाळेजवळ सार्वजनिक जागी लावलेल्या गरबा मंडपात हा सगळा प्रकार घडला. या घटनेविषयी चंद्रसिंग जहागीर पावरा, रा.धनाजे बु. यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

दुर्गा देवीच्या मंडपात बुट, चप्पल घालून गरबा खेळण्यास हटकल्यावरून शुभम जुजार पावरा आणि विशाल जयसिंग पावरा यांना राग आला. त्या रागातून जमावासह येऊन फिर्यादीचा भाऊ निलेश याला दोघांनी जबर मारहाण केली. महेश वीरसिंग याने काठीने हातावर व पायावर मारहाण केली तर शुभम जुजार पावरा याने लोखंडी सळईने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्याच्या मागील बाजूस जबर दुखापत केली. इतरांनी पोटावर व पाठीवर हाताबुक्यांनी मारहाण केली. यानंतर जमावाने गरबा मंडळाच्या ठिकाणी एकत्रीत येवून मंडपाचे व लाईटिंगचे ५००० रुपयांचे नुकसान केले. मंडप तोडल्याने तसेच दुर्गा देवीची मूर्ती तुटून पडली, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

गरबा : ६ लोकांना पोलिसांनी केली अटक

यावरून 6 जणांना धडगाव पोलिसांनी लगेचच अटक केली. तसेच या फिर्यादीवरून शुभम जुजार पावरा रा- पालखा ता- धडगाव, महेश विरसिंग पावरा रोषमाळ, संदीप लुल्या पाटीलपाडा, पियुष गौतम पावरा रा – शिंपी गल्ली धडगाव, विशाल जससिंग पावरा रा- मनखेडी ता- धडगाव, अशोक लखन पावरा रा- रोषमाळ, अजित काकडया पावरा, आनंदा पावरा दोन्ही रा चोंदवाडे बु, तुषार रमेश पावरा रा रोषमाळ, सचिन दिलवर पारा रा- रोषमाळ, संजय वनकर पारा रा रोषमाळ, कैलास दिलवरसिंग पावरा – रा- रोषमाळ, मनोज कैलास पावरा रा रोषमाळ ता- धडगाव व इतर १० ते १२ यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक राहुल भदाणे करीत आहेत. या घटनेत निलेश जहांगीर पावरा वय- २५ रा- धनाजे बु हा जमावाने लाथा बुक्या, काठी व सळईने केलेल्या जबर मारहाणीत गंभीर जखमी झाला म्हणून त्यास जळगाव धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तथापि पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गरबा आयोजन केल्याबद्दलही फिर्याद दाखल

दरम्यान, ५ पेक्षा जास्त व्यक्तीचा समावेश असलेल्या मंडळीस किंवा मिरवणुकीस मनाई आदेश जिल्हाधिकारी यांनी पारीत केला होता. तरी धनाजे बु गावी जिल्हा परिषद शाळेसमोर दुर्गा देवीची स्थापना करुन गरबा कार्यक्रमाचे आयोजन करीत आदेशाचे उल्लंघन केले; अशी फिर्याद धडगाव पोलीस ठाण्याचे पोलिसनायक पुष्पेंद्र पुडंलिक कोळी यांनी दिल्यावरून याप्रकरणी दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला.

यात अनिल कुटा पावरा, रोहिदास कुटा पावरा, मिनेष जहागीर पावरा, चंद्रसिंग जहागीर पावरा १/ ते ४ रा धनाजे बु ता धडगाव, शुभम जुजार पावरा रा पालखा धडगाव, महेश विरसिंग पावरा उ रा- शिंपी गल्ली धडगाव, संदीप लुल्या पावरा रा- मनखेडी पाटीलपाडा धडगाव, पियुष गौतम पावरा रा. शिंपी गल्ली धडगाव, विशाल जयसिंग पावरा रा मनखेडी धडगाव, अशोक लखन पावरा रा रोषमाळ, अजित काकडया पावरा, आनंद पावरा पुर्ण नाव माहित नाही रा रोषमाळ, तुषार रमेश पावरा रा- रोषमाळ, सचिन दिलवर पावरा रोषमाळ पाटीलपाडा, संजय बनकर पावरा रा रोषमाळ, केलास दिलवरसिंग पावरा रा रोषमाळ, मनोज कैलास पावरा रा रोषमाळ धडगाव १० ते १२ इसम यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

Back to top button