सुधीर मुनगंटीवारांचा उध्दव ठाकरेंवर हल्‍लाबोल, “अशा व्यक्तीने राजकारणात…” | पुढारी

सुधीर मुनगंटीवारांचा उध्दव ठाकरेंवर हल्‍लाबोल, "अशा व्यक्तीने राजकारणात..."

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तींने आपली सदसदविवेक बुद्धी वापरली पाहिजे होती. दुसऱ्याने सांगितल्यामुळे मेंदू हॅक होत असेल, तर अशा व्यक्तीने राजकारणात कधीच नेतृत्व करू नये, अशा शब्‍दांमध्‍ये भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्‍लाबोल केला.

त्याचवेळी त्यांचा खरा चेहरा आपल्याला पाहायला मिळाला…

माध्यमांशी बोलतानामुनगंटीवार म्हणाले, तुमच्यावर कोणी दबाव टाकला असेल आणि, खुर्ची टिकावी म्हणून जर असा निर्णय घेतला असेल तर महाराष्ट्रातील जनतेने अशा कमजोर लोकांना ओळखून घ्यावे. आधी त्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला. नंतर त्याच समृद्धी महामार्गाला स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा हट्ट केला. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्याला एकमताने मान्यता दिली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत युती केली. मात्र त्यानंतर घोषणा करून आमचे सर्व दरवाजे उघडे असल्याचे वक्तव्य केले. त्याचवेळी त्यांचा खरा चेहरा आपल्याला पाहायला मिळाला होता, असेही ते म्हणाले.

तुम्ही राज्यकर्त्यांशी चर्चा करीत नाहीत हे बरोबर नाही

दरम्यान,बारसु प्रकल्प व्हावा म्हणून त्यावेळेस त्यांनीच पत्र दिलं. आता मात्र सत्तेतून बाहेर पडल्यावर माझ्याकडून ते पत्र करून घेतलं असं म्हणत असेल तर त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याचा अधिकार नाही. कोकणामध्ये प्रगती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. जर त्यांचा प्रकल्पाला विरोध असेल तर मुख्यमंत्र्यांशी संवाद करावा. वेळ घ्यावा या मुद्द्याला माझा विरोध असल्याचे सांगावे. तुम्ही जाऊन सभेत चर्चा करता राज्यकर्त्यांशी मात्र चर्चा करीत नाहीत हे बरोबर नाही, असेही मुनगंटीवार म्‍हणाले.

हेही वाचा :

Back to top button