अमरावती: आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तरुणीवर अत्याचार | पुढारी

अमरावती: आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तरुणीवर अत्याचार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’वर झालेल्या ओळखीतून प्रेमसूत जुळले. त्यानंतर तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिचा विनयभंग करण्यात आला. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि. १४) राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी रोशन संतोष देशमुख (रा. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर रोशन देशमुख याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यावर त्यांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर रोशनने पीडित तरुणीला एका ठिकाणी बोलावून शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी पीडित तरुणीने त्यास नकार दिला. त्यावर रोशनने पीडित तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनविला. दरम्यान, १३ एप्रिल रोजी सकाळी पीडित तरुणी ही रोशनला भेटायला अकोला येथे गेली. यावेळी रोशनने पीडित तरुणीला तेथील एका शेतशिवारात नेत तिच्यावर अत्याचार केला.

पीडित तरुणीने रोशनला लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून रोशनविरुद्ध बलात्कार व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा  

Back to top button