अमरावती, वर्ध्यातील नागरिकांनो पुढील दोन दिवस घराच्या बाहेर पडू नका; वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

अमरावती, वर्ध्यातील नागरिकांनो पुढील दोन दिवस घराच्या बाहेर पडू नका; वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अमरावती व वर्धा शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आगामी दोन तासात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आसाम व ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण राज्यात शुक्रवारी व शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवार ७ एप्रिल रोजी दुपारी हवामान विभागाने विदर्भातील अमरावती व वर्धा शहराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दोन्ही शहरात वादळी वाऱ्याचा वेळ ताशी 40 किमी असून यामध्ये कच्च्या घरांचे नुकसान होऊ शकते. तसेच वीजही पडू शकते. त्यामुळे दुपारी 4 ते 7 या वेळेत घराबाहेर पडू नका, असा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच आगामी दोन तासात पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग,रत्नागिरी या ठिकाणीही वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news