

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अधिक पहा :" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वरोऱ्याहून भद्रावतीकडे रेसर बाईकने फिरण्यासाठी आलेल्या दोन मित्रांचा मानोरा फाट्याजवळ दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.(Accident)
हर्ष सुरेश पाचभाई (वय २२, रा. गणेश नगर वरोरा), अंकुश सुनील भडगरे (वय २३ रा. सिद्धार्थ नगर वरोरा) असे अपघातात ठार झालेल्या दोन युवकाचे नाव आहे. (Accident)
अंकुश हा आपली बाईक घेवून त्याचा मित्र हर्षला वरोरा येथील जिम आटोपून भद्रावतीकडे रेसर बाईक (क्र. ३४ सीसी ९६३९) ने फिरण्याकरिता येत होता. दरम्यान नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील भद्रावती लगतच्या मानोरा वळण रस्त्यावर बाजूला असलेल्या दगडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी होती की हे दोघेही हवेत उडून मानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपटले. यात हर्ष पाचभाई याचा जागीच मृत्यू झाला. तर अंकुश भडगरे याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="ASC" orderby="post_title" view="list" /]
अधिक वाचा :