वाशिम: समृद्धी महामार्गावरील अपघातात बापलेकीसह तरूणी ठार

वाशिम: समृद्धी महामार्गावरील अपघातात बापलेकीसह तरूणी ठार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: अकोला येथील इंटरचेजवरुन समृद्धी महामार्गावर आलेल्या भरधाव कारने नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पाटीमागुन जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला डॉक्टरसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. या अपघात भारत क्षीरसागर व डॉ. ज्योती भारत क्षीरसागर (दोघेही रा. मालेगाव) आणि डॉ. फाल्गुणी सुरवाडे (रा. अमरावती) यांचा  मृत्यू  झाला.

डॉ. ज्योती ही भारत क्षीरसागर यांची मुलगी असून डॉ. फाल्गुणी ही ज्योतीची मैत्रिण आहे. दोघीही दंत चिकित्सक आहे. हे सर्वजण कारने (एमएच. ३७ जी. ३५५८) नागपुरला जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार अकोला येथील इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर चढली. दरम्यान, भरधाव कार कोटंबा फाट्याजवळ समोरील (एमएच.०४ डी.एल. ८२३५) ट्रकवर आदळली.

यात कारचा समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. यात कारमधील तिघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास जाम पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news