यवतमाळ: भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार मुलगा ठार | पुढारी

यवतमाळ: भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार मुलगा ठार

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ शहरात भरधाव ट्रकने एका दहा वर्षीय मुलगा चिरडल्याची घटना यवतमाळ ते नागपूर रोडवरील शनी मंदिर चौकात शुक्रवारी सायंकाळी घडली. यात बालक जागीच ठार झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलाच्या अपघाती निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

आयुष राजेश आत्राम हा मुलगा सायकलने रस्ता पार करीत होता. याचवेळी यवतमाळकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने मुलगा चालवत असलेल्या सायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, सायकलस्वार मुलगा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त ट्रक व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरासह जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिंगरोड असताना जड वाहतूक शहरातून कशी काय होत आहे ? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थितीत केला. ही वाहने सुसाट वेगाने धावतात. यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button