चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. भजन अंनत पारई (वय ५०) रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्डातील भजन पारई हे मोलमजुरी करुन आपल्या परिवाराचा सांभाळ करत होते. शनिवारी (दि.२५) ते सरपण गोळा करण्यासाठी एमईएल लगतच्या जंगलात गेले होते. बराच वेळ घरी परत न आल्याने जंगलात त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या शरिराचे काही अवयव आढळून आले. वन विभागाने अधिक तपास केला असता वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

घटनेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी भजन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली तसेच शासनातर्फे मिळणारी आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी शासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजीत शाहा, अमोल शेंडे उपस्थित होते.

Back to top button