चंद्रपूर : राजुरा तालुक्यात वीज पडून ७ जण जखमी | पुढारी

चंद्रपूर : राजुरा तालुक्यात वीज पडून ७ जण जखमी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून सातजण जखमी झाल्याची घटना घडली. शुक्रवारी (दि.२४) दुपारी १ च्या दरम्यान ही घटना घडली. सर्व जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितनुसार, शुक्रवारी दुपारी १ वाजेदरम्यान सिंधी येथील मधुकर धानोरकर यांचे शेतात शेतमालक स्वतः, त्यांची पत्नी व इतर १५ मजुर काम करित होते. दुपारच्या सुमारास या परीसरात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान व अचानक पणे वीज कोसळून मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी, किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भाष्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृनाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी आदी सातजण जखमी झाले असून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय राजुरा दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button