चंद्रपुरात मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन | पुढारी

चंद्रपुरात मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हुकुमशाहीवृत्तीने कारभार करीत अनेक जनविरोधी निर्णय घेतले जात आहेत. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा खरा हुकुमशाहीवृत्तीचा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर आणला. त्यामुळे केंद्र सरकारकडून सुडबुद्धीने अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी म्हणाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारविरोधात रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात गुरुवारी (२३ मार्च) ला सायंकाळी ४ वाजता शहरातील गांधी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शफक शेख, माजी महापौर संगीता अमृतकर, ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रवीण पडवेकर यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button