वर्धा : संपाच्या तीन दिवसांत सात सामान्य तर दोन सिझेरियन प्रसुती | पुढारी

वर्धा : संपाच्या तीन दिवसांत सात सामान्य तर दोन सिझेरियन प्रसुती

वर्धा,पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांचा बेमुदत संप सुरू आहे. बेमुदत संपामुळे विविध कामांचा खोळंबा झाला आहे. कामे प्रभावीत झाली आहेत. संपामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढलेला आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संप सुरू झाल्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सामान्य रुग्णालयात नऊ प्रसुती झाल्यात. त्यात सात प्रसुती सामान्य तर दोन प्रसुती सिझेरियन झाल्यात. तीन दिवसांच्या काळात सुमारे अडीच हजारांवर रुग्णांना रुग्णसेवा देण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढू लागला आहे. आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. १४ ते १६ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत अडीच हजारांवर रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांवर औषधोपचार करण्यात आलेत. त्यामध्ये स्त्री, पुरुष रुग्णांसोबतच बाल रुग्णांचा समावेश आहे. तीन दिवसांत प्रसुतीदेखील झाल्यात. त्यामध्ये सात सामान्य प्रसुती असून दोन प्रसुती रिझेरियन झाल्यात. जिल्हास्थळी सध्या तरी आरोग्य सेवेवर ताण वाढलेला असला तरी रुग्णसेवा सुरू असल्याचे दिसून येते.

सामान्य रुग्णालयात १४ मार्च रोजी ९६४ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दोन प्रसुती साधारण झाल्यात. १५ मार्च रोजी ९५३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ५ प्रसुती झाल्यात. १६ मार्च रोजी दोन प्रसुती सिझेरियन झाल्यात. एकूण ७०६ रुग्णांची नोंद झाली.

.हेही वाचा 

छत्रपती संभाजीनगर: अजिंठा परिसरात गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान

नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

 

Back to top button