Viagra Pills : दारू पिऊन व्हायग्राच्या दोन गोळ्या घेतल्याने एकाचा मृत्यू, वाचा डॉक्टर काय म्हणाले… | पुढारी

Viagra Pills : दारू पिऊन व्हायग्राच्या दोन गोळ्या घेतल्याने एकाचा मृत्यू, वाचा डॉक्टर काय म्हणाले...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Viagra Pills : नागपूर येथे एका 41 वर्षीय पुरुषाचा दारू पिऊन दोन व्हायग्रा गोळ्या घेतल्याने मृत्यू झाला. डॉक्टरांनी अभ्यासात याला एक दुर्मिळ घटना म्हटले आहे. एनडीटीव्हीने जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचा हवाला देत news.au.com वरून याचे वृत्त दिले आहे.

व्हायग्राचे औषध या सामान्यपणे पुरुषांमधील लैंगिक समस्यांशी निगडीत समस्यांवर जसे की नपुंसकत्व आणि ED असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात.

Viagra Pills : घडलेल्या दुर्मिळ घटनेत नागपुरातील एक 41 वर्षीय व्यक्ती जो आपल्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने तिथे दारू पिऊन व्हायग्रा ब्रँडच्या दोन सिल्डेनाफिलच्या गोळ्या खाल्ल्या ज्या प्रत्येकी 50मिलीग्रामच्या होत्या. डॉक्टरांनी म्हटले आहे, त्या व्यक्तीचा पूर्वीचा कोणताही वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेचा मोठा इतिहास नव्हता. सकाळी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. त्याच्या मैत्रिणीने त्याला लगेचच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने मला यापूर्वीही असे झाले आहे. चिंतेचे कारण नाही, असे सांगितले. मात्र नंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अभ्यासानुसार, सेरेब्रोव्हस्कुलर हॅमरेजमुळे त्या माणसाचा मृत्यू झाला, जेव्हा मेंदूला ऑक्सिजनचे वितरण कमी होते.

Viagra Pills : पोस्टमॉर्टम स्कॅनमध्ये, डॉक्टरांना 300 ग्रॅम रक्त गोठलेले आढळले. त्यांनी असा निष्कर्ष काढला की अल्कोहोल आणि औषधांचे मिश्रण तसेच आधीच अस्तित्वात असलेला उच्च रक्तदाब यामुळे त्याचा मृत्यू झाला.

अभ्यासाच्या लेखकांनी सांगितले की त्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय इरेक्टाइल डिसफंक्शन औषधे घेण्याच्या जोखमींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही दुर्मिळ केस प्रकाशित केली.

हे ही वाचा :

WhatsApp Features: व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर लाँच; अनोळखी नंबर करता येणार म्यूट

Ind vs Aus 4th Test : अहमदाबाद कसोटीत रोहितला सुधाराव्या लागतील ‘या’ मोठ्या चुका!

Back to top button