चंद्रपूर: अपघातातील जखमींच्या मदतीला धावून आले मंत्री सुधीर मुनगंटीवार | पुढारी

चंद्रपूर: अपघातातील जखमींच्या मदतीला धावून आले मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर- मूल मार्गावर झालेल्या कार आणि दुचाकी अपघातादरम्यान राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावून आले. मुख्य मार्गावर पडून असलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयाकडे मुनगंटीवार यांनी रवाना केले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचले. हा अपघात आज (दि.४) घडला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथील चांदा क्लबच्या मैदानावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मूलकडे रवाना झाले. सावलीतील पेंढरी (मक्ता) येथे आयोजित मत्स महोत्सवासाठी ते निघाले होते. यावेळी चंद्रपूर – मूल मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना आपल्या वाहनांचा ताफा थांबविण्याची सूचना केली. मुनगंटीवार यांनी वाहनातून खाली उतरून अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केली. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. आणि चंद्रपूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना फोनवरून तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या. वेळेवर उपचार होऊ शकल्याने जखमींचे प्राण वाचले. याबद्दल जखमींच्या कुटुंबियांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button