भंडारा : सिंदपुरी येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

भंडारा : सिंदपुरी येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : सिंदपुरी(सि.) येथील जितेंद्र शंकर कटरे यांच्या घराला आग लागून अंदाजे ५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.२६) पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास घडली. जितेंद्र कटरे हे नेहमीप्रमाणे गाढ झोपेत असतानाच अचानक मागच्या बाजूने घराला आग लागल्याचे दृश्य घराशेजारच्या लोकांना दिसले. या वेळी शेजारील नागरिकांनी आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. त्यातच घरचे सर्व लोक जागे झाले. पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली. त्यामुळे घरातील साहित्य वाचविता आले नाही.

स्वयंपाक खोलीत ठेवलेला गॅस सिलेंडर गावकऱ्यांनी तत्परता दाखवून बाहेर काढला. त्यामुळे जीवहानी सुद्धा टळली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. यात अन्न-वस्त्र, निवारा व रोख रक्कमेसह अंदाजे ५ लाख रुपयाची हानी झाली आहे. या अग्नी तांडवात स्वयंपाकाची भांडी ही सुद्धा जळून खाक झाली. राहण्यासाठी योग्य निवारा राहिलेला नाही. आजच्या घडीला पीडीत कुटुंबाने दुसऱ्यांच्या घरी आश्रय घेतलेला आहे. सध्या त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था घराशेजारील तथा कुटुंबातून केलेली जात आहे. आग लागल्याचे कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी, नुकसान ग्रस्ताला शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button