Chandrashekhar Bawankule : हा तर दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याचा प्रकार : बावनकुळे | पुढारी

Chandrashekhar Bawankule : हा तर दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याचा प्रकार : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एखाद्या कुटुंबात मुल होत नाही. तेव्हा दुसऱ्याचे मुल आणून बारसे करण्याचा प्रकार ठाकरे गटाचा संभाजीनगर आणि धाराशिव नामकरणावरून सुरू आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.(Chandrashekhar Bawankule)

यावेळी बावनकुळे म्हणाले, एवढे दिवस सत्ता गाजवली त्यावेळी नामांतरणाचा विचार केला नाही. मात्र, सत्ता जाताना अल्पमतात कॅबिनेटमध्ये देखावा केला असा आरोप बावनकुळे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बोलतात ते अगदी पुराव्यानिशी आणि विचारपूर्वकच बोलतात उगीचच संभ्रम निर्माण करत नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. (Chandrashekhar Bawankule)

या निर्णयाला एमआयएमचा आधीपासून विरोध होता. त्यांनी कितीही आंदोलने केली, तरी काही फरक पडत नाही. अनेक वर्षानंतर हा लढा संपला असून जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे. दरम्यान, आपले नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊ नयेत, अशी भीती अजित दादांना आहे. त्यामुळेच ते मध्यावधीची भाषा बोलत आहेत. उद्या ओवेसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील, तर ओवेसींकडे उद्धव ठाकरे स्वतः जातील. सपाशी मैत्रीतही त्यांना काही वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी खालची पातळी गाठली आहे. किंबहुना उद्धव ठाकरे यांची एवढी वाईट स्थिती होईलॉ असा महाराष्ट्राने कधी विचारही केला नव्हता असा टोला लगावला.

हेही वाचा;

Back to top button