

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा; उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईल तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या घटना घडल्यामुळे परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी–मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द केली आहे. त्याएवजी सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात आली आहेत. परिक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. (SSC HSC Exam)