नागपूर : भाजपच्या मिशन लोकसभा ‘वॉर रूम’चा शुभारंभ    | पुढारी

नागपूर : भाजपच्या मिशन लोकसभा 'वॉर रूम'चा शुभारंभ   

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागली असून, विदर्भातील सर्व जागा जिंकण्याचा पक्षाचा निर्धार आहे. आज (दि. ५) विदर्भात समन्वयाच्या दृष्टीने वॉर रूमचा शुभारंभ केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहर भाजप अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, विदर्भ मीडिया प्रमुख संजय फांजे आदी उपस्थित होते.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाच्या दृष्टीने ही अद्ययावत यंत्रणा महत्त्वाची असून, २०२४ च्या निवडणुकीसाठी डेटा मॅनेजमेंट या माध्यमातून होईल. प्रत्येक बुथवर  ३० कार्यकर्ते अशा पद्धतीने समन्वय साधला जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यात  महत्त्वाची भूमिका असणार आहे. तसेच समाजाच्या विविध घटकांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वस्पर्शी होण्याच्या दृष्टीने पक्षाला मदत मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button