गांधी-विनोबांच्या विचारांची शाश्वतता चिरंतन : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे | पुढारी

गांधी-विनोबांच्या विचारांची शाश्वतता चिरंतन : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या साहित्य संमेलनात दिसणारी वैचारिक अस्पृश्यता आता लोप पावत असून, गांधी आणि विनोबांच्या विचारांची शाश्वतता, चिरंतरता कधीही प्रश्नचिन्हांकित केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालय परिसरात सुरु असलेल्या ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आज ( दि. ५ ) पार पडलेल्या ‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ या परिसंवादात ते अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात गोवा येथून रमाकांत खलप, मुंबई येथून डॉ. प्रशांत धर्माधिकारी, पुणे येथून भानू काळे, नांदेड येथून श्रीकांत देशमुख व नागपूर येथून देवेंद्र गावंडे सहभागी झाले होते.

परिसंवादात डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी ‘नित्य नूतन, चिर पुरातन’ अशी धारणा भारतीय संस्कृती जपते. काळाच्या प्रवाहात विचार चौकटीचे नव्याने परिशिलन होते, हे तत्व आपण स्वीकारले आहे. त्यामुळे, प्रासंगिकतेपुढे प्रश्न उपस्थित करावे, असे वाटत नाही. गांधी – विनोबांचा  विचारांची पाळमुळं या भूमीत रुजली आहेत. त्यांच्या विचारांची विश्वदृष्टी मान्य होण्यासारखी आहेत. इथल्या लोकशाहीत अध्यात्म आहे आणि म्हणूनच सत्तांतर होताना कधीही रक्तपात होत नाही.

संयुक्त राष्ट्रसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा गेले होते तेव्हा जी – २०, जी – ७ पेक्षा ‘जी – ऑल ‘ का होऊ शकत नाही, असा बृहद विचार त्यांनी दिला. हे सर्व गांधी, विनोबा आणि इतर महनीय विचारकांच्या दृष्टीतूनच आल्याची भावना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी अध्यक्षस्थानाहून व्यक्त केली. संचालन डॉ. रेखा दंडिगे घिया यांनी केले. आभार प्रा. प्रफुल्ल दाते यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button