Gram panchayat election : राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये डिसेंबरमध्ये रणधुमाळी

Gram panchayat election : राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये डिसेंबरमध्ये रणधुमाळी

विविध कारणास्तव राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये (Gram panchayat election) रिक्त असलेल्या ७ हजार १३० जागांसाठी पोटनिवडणुकीची कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांवर ही पोटनिवडणूक होत आहे. (Gram panchayat election) ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. नामनिर्देशन पत्रांची छाननी ७ डिसेंबरला होईल. अर्ज ९ डिसेंबरपर्यंत मागे घेता येतील.

११३ नगरपंचायतींच्या २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार

एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८८, डिसेंबर २०२१ मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या १८ आणि ७ नवनिर्मित अशा एकूण ११३ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. तर मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच, प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news