अमरावती पदवीधर निवडणूक : दुपारी २ पर्यंत ३०.४० टक्के मतदान | पुढारी

अमरावती पदवीधर निवडणूक : दुपारी २ पर्यंत ३०.४० टक्के मतदान

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दुपारी २ वाजेपर्यंंत विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये २६२ मतदान केंद्रावर सरासरी ३०.४० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
अमरावती जिल्ह्यात ७५ मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत २६.१५ टक्के मतदान झाले आहे. अकोला जिल्ह्यात ६१ मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत २८.४५ टक्के मतदान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत ३३.४७ टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत ३५.६० टक्के मतदान झाले आहे. तर वाशीम जिल्ह्यात २६ मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत ३४.३७ टक्के मतदान झाले आहे. मतदारांना दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
हेही वाचा 

Back to top button