Air India Urination Case : शंकर मिश्राच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला | पुढारी

Air India Urination Case : शंकर मिश्राच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: एअर इंडियाच्या विमानात (Air India Urination Case) महिलेवर लघुशंका केल्याचा गंभीर आरोप असलेल्या शंकर मिश्राच्या जामीन अर्जावरील निकाल पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी (दि.३०) राखून ठेवला. न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या विमानात मिश्रा याने हा किळसवाणा प्रकार केल्याचा गंभीर आरोप आहे.

मिश्रा याने केलेल्या प्रकारामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी झालेली आहे. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये. शिवाय आरोपीकडून तक्रारदाराला धमकी देण्यात आली असल्याचे पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. यावर सदर प्रकरणातील साक्षीदार तुमच्या बाजुने बोलत नसल्याची टिप्पणी अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती हरजोत भल्ला यांनी पोलिसांना उद्देशून केली. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मिश्रा याने संबंधित किळसवाणा प्रकार केला होता. मात्र त्याच्या कित्येक दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. महिलेने एअर इंडियाकडे (Air India Urination Case) केलेल्या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी ४ जानेवारीरोजी मिश्रा याला अटक केली होती.

हेही वाचलंत का ?

Back to top button