नागपूर : कापसाला १० हजार रुपयांचा भाव मिळावा; अनिल देशमुखांची केंद्राकडे मागणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांचा भाव मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात देशमुख यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिले आहे.
पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, ” केंद्र सरकारचा सध्याचा हमीभाव प्रति क्विंटल ६ हजार ३८० रुपये असून तो खूपच कमी आहे. त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यावेळी १३ हजार गाठीची निर्यात कमी झाली, दुसरीकडे १२ हजार गाठीची आयात करण्यात आली. आयात शुल्क वाढवावे, निर्यात वाढावी यादृष्टीने केंद्र सरकारने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.”
सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत ६ हजार ३८० रुपये निश्चित केली आहे. हा हमीभाव खूपच कमी असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दर कमी असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी कमी कापूस जात आहे. सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे, असेही देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता https://t.co/7hqx25kq37 #Pudharionline #Pudharinews #PMKisan #Farmer
— Pudhari (@pudharionline) January 28, 2023
हेही वाचा
- नागपूर : थकीत भाड्यामुळे ठाकरे गटावर कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की
- नागपूर : कारमध्ये कोंबून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, वर्गमित्रानेच केला विश्वासघात
- नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट!