नागपूर : कारमध्ये कोंबून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, वर्गमित्रानेच केला विश्वासघात | पुढारी

नागपूर : कारमध्ये कोंबून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, वर्गमित्रानेच केला विश्वासघात

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – वर्गमित्राने विद्यार्थीनीला भेटीसाठी बोलावून घेतले. ती येताच मित्राच्या मदतीने कारमध्ये कोंबून तिचे अपहरण केले. जंगलात नेऊन दोघांनीही सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दोन युवकांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अखिल महाविर भोंगे (वय २६, रा. पंदराखेडी, ता. सावनेर) आणि पवन विठ्ठलराव बासकवरे (वय २४, मानेगाव, ता. सावनेर) अशी अटकेतील या आरोपींची नावे आहेत.

१६ वर्षीय पीडित मुलगी दहावीत शिकते. अखिल भोंगे हा तिचा वर्गमित्र आहे. त्याने तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. त्यांच्यात प्रेम झाले. पवन बासकवरे हा अखिलचा जीवलग मित्र आहे. २३ जानेवारीला सायंकाळी अखिल प्रेयसीला भेटण्यासाठी थेट शाळेत आला. यावेळी पनवसुद्धा त्याच्यासोबत होता. अखिलने पीडितेसोबत बोलणी करून तिला सोबत फिरायला जाण्यासाठी राजी करून घेतले. आरोपींच्या मनात नेमके काय चालले हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. ती सहजपणे फिरायला जाण्यासाठी तयार झाली आणि घात झाला. ठरल्याप्रमाणे पीडिता शाळेबाहेर पडताच अखिलने तिला कारमध्ये ओढून घेतले. त्यानंतर ही कार नागपूरच्या दिशेने सुसाट निघाली. आरोपींनी वाटेतच निर्जन ठिकाणी जंगली भागात कार थांबविली. बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

या घटनेनंतर पीडिता बेशुद्ध झाली. आरोपी तिला रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाचे तिच्याकडे लक्ष गेले. जवळ जाऊन बघितले असता ती जिवंत होती. त्याने तिला पिण्यासाठी पाणी दिले आणि घरी सोडून देण्याबाबत विचारले. तिने सावनेर पोलिस ठाण्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. ती पोलिस ठाण्यात पोहचली. तिने पोलिसांनी घडलेली प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Back to top button