यवतमाळ : ट्रकची कारला धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर | पुढारी

यवतमाळ : ट्रकची कारला धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि कारच्या धडकेत एका युवतीसह तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरूणी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि.११) सायंकाळी लाडखेड यवतमाळ-नेर रोडवरील सोनवाढोणा वळणावर घडली.
आचल दयानंद निनावे (वय १९, रा. बोरगाव लिंगा), करण प्रमोद मेडवे (वय २७), अशी मृतांची नावे आहे. साक्षी करवाडे ही तरुणी गंभीर जखमी झाली. यवतमाळवरून एक ट्रक अमरावतीला जात होता. तर एक कार अमरावती येथून यवतमाळकडे येत होती.

सोनवाढोना जवळ येताच ट्रक व कारची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघात झाला. यात एक युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेतेतील तरुण व एका तरुणीला उपचारासाठी यवतमाळ येथे आणण्यात येत असताना तरुणाचा वाटेत मृत्यू झाला. गंभीर जखमी तरुणीला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला होता. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button