केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; घर, कार्यालयाची सुरक्षा वाढविली | पुढारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; घर, कार्यालयाची सुरक्षा वाढविली

नागपूर ; पुढारी ऑनलाईन भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आज (शुक्रवार) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर नागपुरात एटीएससह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

आज (शनिवारी) साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा फोन आल्यानंतर पोलिस प्रशासन धमकीच्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील खामलास्थित जनसंपर्क कार्यालयात दोन वेळा दाऊदच्या नावाने धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे.

गडकरी खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सध्या नागपुरात आहेत. या धमकीच्या फोननंतर गडकरींच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकच वाढ करण्यात आली आहे. त्यांचे घर आणि कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. फोनवर शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसचे पथक या ठिकाणी आले आहे. कुख्यात गुन्हेगार डॅान दाऊदच्या नावाने धमकी दिल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

हेही वाचा : 

Back to top button