नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि. १३) संपन्न होत आहे. सन २०२३-२४ साठी १ हजार कोटींचा आराखडा नियोजन विभागाने तयार केला आहे. शुक्रवारी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे यावेळी ऑनलाइन सहभागी होणार आहेत.