नागपूर : कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्‍या कुख्यात गुंडाने केला मित्राचा खून ; खूनसत्राने उपराजधानी हादरली | पुढारी

नागपूर : कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्‍या कुख्यात गुंडाने केला मित्राचा खून ; खूनसत्राने उपराजधानी हादरली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटून आलेल्या  कुख्यात गुंडाने आपल्याच मित्राची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गेल्या १० दिवसांतील उपराजधानीतील हे पाचवे हत्याकांड आहे. विक्की चंदेल असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर राकेश पाली असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश पाली आणि विक्की चंदेल हे मित्र होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही मिळून प्रतिस्पर्धी टोळीतील युवकाचा खून केला होता. या हत्याकांडात दोघेही मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. काही दिवसापूर्वीच राकेश पाली कारागृहातून पॅरोलवर सुटून आला होता. दोघांनाही दारुचे व्यसन होते. विक्कीने गेल्या आठवड्यात राकेशचा भाचा शुभम याला शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. त्याने मामा राकेशकडे तक्रार केली. त्यामुळे चिडलेल्या राकेशने विक्कीचा काटा काढण्याचा कट रचला.

बुधवारी रात्री बारा वाजता पार्वतीनगरात विक्की चंदेल याला राकेशने बोलावले. विक्की पोहोचताच तेथे राकेशने साथिदारांच्या मदतीने त्याला घेरून काही कळण्यापूर्वीच तलवार-चाकूने सपासप वार करीत खून केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून शुभम भांजा याला ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button