अडीच वर्ष सरकार बंदिस्त होतं : देवेंद्र फडणवीसांचा घणाघात | पुढारी

अडीच वर्ष सरकार बंदिस्त होतं : देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकार काय असते याची जाणीव गेल्या सहा महिन्यात जनतेला झाली आहे. त्‍यापूर्वीच्‍या अडीच वर्षांमध्‍ये सरकार बंदिस्त, दाराआड होतं. जनतेत सरकारची फक्त वसूली दिसायची. वसुलीचे उच्चांक मागच्या सरकारने गाठले होते, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर केला. अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, “सरकार काय असते याची जाणीव गेल्या सहा महिन्यांमध्‍ये झाली आहे. गेली अडीच वर्षे सरकार बंदिस्त होतं. जनतेत सरकारची फक्त वसूली दिसायची. वसुलीचे उच्चांक मागच्या सरकारने गाठले होते. म्हणूनच मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत जेलमध्ये जात आहेत. वर्क फ्रॉम होम बघितलं होतं; पण वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदाच पाहिलं. जेलमध्ये असतानाही मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. जनादेशाचा विश्वासघात करून, पाठीत खंजीर खुपसून याआधीचे सरकार आले होते; पण हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेंनी उठाव केला. महाराष्ट्रात परिवर्तन घडविले.”

विदर्भ मराठवाड्याला ठाकरे सरकारने अडीच वर्ष पैसेच दिले नाहीत. जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येतं त्या वेळी तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं जातं. गेल्या सरकारने वैधानिक विकास मंडळाची हत्या केली. पण आमचे सरकार येताच पुन्हा वैधानिक विकास मंडळाची निर्मिती केल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button