अमरावती: वॉन्टेड आरोपी आठ वर्षानंतर गजाआड | पुढारी

अमरावती: वॉन्टेड आरोपी आठ वर्षानंतर गजाआड

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : आठ वर्षांपासून ‘वाँटेड’ असलेल्या एका आरोपीला राजापेठ पोलिसांनी शनिवारी (दि.७ ) उशिरा रात्री अकोल्यातून अटक केली. रशीद शहा ऊर्फ तलवार सिंग हमीद शहा (वय 47, रा. ताजनगर, झोपडपट्टी, अकोला) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो अकोल्यातून गुजरातमध्ये जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी राजापेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रविवारी पहाटे शहरात आणले.

रशीदविरुध्द राजापेठ पोलीस ठाण्यात 2014 मध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. त्या प्रकरणात पोलिसांनी त्याला एकदा अटक केली व न्यायालयात हजर केले होते. दरम्यान त्यानंतर तो जामिनावर बाहेर पडला होता. त्यानंतर पुन्हा मागील आठ वर्षांत पोलिसांना सापडलेला नव्हता. या काळात न्यायालयाने त्याचे पकड वॉरंट बजावले. मात्र, तरीही पोलिसांना तो काही सापडत नव्हता. दरम्यान, रशीद शहा अकोल्यात असून शनिवारी मध्यरात्री गुजरातमध्ये जाणार असल्याची गोपनीय माहिती राजापेठचे ठाणेदार मनिष ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक अकोल्यात पाठवले. राजापेठ पोलिसांनी त्याला अकोल्यातून ताब्यात घेवून अटक केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button