चंद्रपूर : नागभीड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) इरव्हा टेकडी येथे घडली. निर्मला प्रकाश भोयर असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दोन महिन्यापासून या परिसरात वाघाने दहशत माजवून तीन ते चार जणांचा बळी घेतता. मात्र, वनविभागाने या परिसरातील वाघांचा बंदोबस्त करण्याकरीता दुर्लक्ष केले. त्यामुळे अदोगर वाघाचा बंदोस्त केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेणार, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती.

याबाबत अधिकची माहिती अशी की, निर्मला भोयर ही महिला शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमी प्रमाणे स्वत:च्या शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेली होती. महिलेचे शेत जंगलाला लागून आहे. वन्यप्राण्यांचा या परिसरात नेहमी वावर आहे. तीन ते चार वाघांचे दर्शन या भागातील नागरिकांना नेहमीच होत असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशत आहे. आज महिला गवत घेत असताना त्याच शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला.

पहार्णी व इरव्हा परिसरात वाघाने आता पर्यंत चार ते पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी अनेकदा वनविभागाला वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरली, परंतु वनविभागाने ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेले वनपाल तावाडे यांना नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news