पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा वाढवण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत ही मागणी करणार असल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान दुपारी १ वाजता शासकीय विमानाने ते मुंबईला अनिल देशमुखांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, कोरोनामुळे अधिवेशनात खंड पडला. यावेळी येथील प्रश्नांवर चर्चा करून न्याय देण्यासाठी १ आठवड्याने कालावधी वाढवावा. आजच्या बैठकीत ही मागणी करणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांची आज भेट घेणार आहे. यासाठी शासकिय विमानाने मुंबईला जाणार असून पुन्हा अधिवेशनासाठी त्याच विमानाने परतणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :