गडचिरोली : नेलगुंडा येथून नक्षलवाद्यास अटक | पुढारी

गडचिरोली : नेलगुंडा येथून नक्षलवाद्यास अटक

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे लपून बसलेल्या वत्ते उर्फ प्रदीप वंजा वड्डे नामक (वय ४०) नक्षलवाद्यास पोलिसांनी रविवारी अटक केली. वत्ते उर्फ प्रदीप वड्डे हा घातपात करण्याच्या हेतूने नेलगुंडा या त्याच्या गावी लपून बसला होता. याबाबत माहिती मिळताच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यास ताब्यात घेतले. वत्ते हा १९९७ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला. सध्या तो भामरागड दलमचा सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ८ खून, ३ चकमकी, १ दरोडा आणि अन्य एक अशा १३ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गडचिरोली पोलिस दलाने जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत ६० नक्षलवाद्यांना अटक केली आहे. शिवाय ८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तर ३ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.

.हेही वाचा 

कोविडला रोखण्यासाठी महापालिकेने पुन्हा कसली कंबर 

नवी दिल्ली : कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या निर्यातीत 12 टक्क्यांची वाढ

अमरावती: दत्तापूर खरेदी विक्री संस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व

 

Back to top button