नवी दिल्ली : कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या निर्यातीत 12 टक्क्यांची वाढ | पुढारी

नवी दिल्ली : कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या निर्यातीत 12 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सरत्या एप्रिल  ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत कृषी आणि कृषीपूरक उत्पादनांच्या  निर्यतीत ११.९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबतची माहिती कृषी मंत्रालयाकडून सोमवारी देण्यात आली. गतवर्षीच्या याच कालावधीतील २६.९८ अब्ज डाॅलर्सच्या तुलनेत यंदाच्या सात महिन्यात ३०.२१ अब्ज डाॅलर्सची निर्यात साध्य झाली आहे.

देशातून प्रामुख्याने ज्या कृषीमालाची विदेशात निर्यात केली जाते, त्यामध्ये बासमती तांदूळ, गहू, कापूस, एरंडेल तेल, काॅफी आणि ताज्या फळांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशातून ५०.२४ अब्ज डाॅलर्स इतक्या किंमतीच्या कृषी आणि कृषीपूरक वस्तूंची निर्यात झाली होती. तत्पूर्वीच्या आर्थिक वर्षात ही निर्यात ४१.८६ अब्ज डाॅलर्स इतकी होती. जुलै २०२० मध्ये ‘किसान रेल‘ ची सुरुवात झाली होती. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. सध्या १६७ मार्गावर किसान रेल कार्यरत आहे.

हेही वाचा

Back to top button