सीमावादावर सोमवारी प्रस्ताव मांडणार, शंभूराज देसाई यांची माहिती | पुढारी

सीमावादावर सोमवारी प्रस्ताव मांडणार, शंभूराज देसाई यांची माहिती

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी ठराव सोमवारी विधानसभेत मांडणार आहोत, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली.

राज्य सरकारच्या भूमिकेचा विस्तृत समावेश असणारा हा प्रस्ताव सोमवारी मांडण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये जे ठरले त्याच्या नेमके उलटे वर्तन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे आहे. हे अतिशय चुकीचे आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर घडलेल्या बाबीसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नसेल, तर केंद्राच्या सूचनांचे उल्लंघन कोण करतेय, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कुणाचे आहेत, हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीवरून स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची आजही भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे, त्यांच्या राज्यातील असो वा आपल्या राज्यातील असो कुणालाही या सीमावादात हिंसा होऊ नये, धक्का पोहचू नये. तसेच कर्नाटकच्या ठरावाबद्दलची तीव्र नाराजी केंद्राला कळविणार आहोत, असेही शंभूराजे देसाई यांनी सांगितले.

.हेही वाचा 

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या, कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही : अजित पवार 

गुटखा विक्रीचा मास्टर माइंड कोण? शिरूरमधील पोलिसांनी तपास करणे गरजेचे

नाशिक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाने राष्ट्रवादी आक्रमक 

Back to top button