

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री, भाजप आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचपुते यांना आज (दि.२२) दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून श्वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, पाचपुते यांच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तूर्तात त्य़ांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधान भवनाच्या मागच्या दारातून आत येत असताना एक गटाराच्या चेंबरमध्ये रुग्णवाहिकेचे मागचे चाक फसले. अखेर लोकांनी धक्का देऊन रूग्णवाहिका बाहेर काढली.
हेही वाचलंत का ?