भंडारा : दीड वर्षीय चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू | पुढारी

भंडारा : दीड वर्षीय चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : अंगणात खेळताखेळता दीड वर्षीय चिमुकला नळाच्या पाण्याच्या टाकीत कोसळला. यातच त्याचा बुडून अंत झाला. प्रियांशू जितेंद्र मेहर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, घटनेच्या वेळी प्रियांशूची आई आंघोळीला गेली होती. त्यावेळी प्रियांशू हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळता-खेळता नळाच्या टाकीकडे गेला. दरम्यान, आंघोळ करुन चिमुकल्याची आई परतल्यानंतर प्रियांशू न दिसल्याने त्याचा शोध घेतला असता प्रियांशू बुडलेल्या अवस्थेत आढळला. आईने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांशूला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button