‘समृद्धी’ महामार्ग गेमचेंजर प्रकल्प, यामुळे नागपूर-मुंबई जवळ येतील, उद्योग वाढून शेतक-यांना मदत होईल – मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

'समृद्धी' महामार्ग गेमचेंजर प्रकल्प, यामुळे नागपूर-मुंबई जवळ येतील, उद्योग वाढून शेतक-यांना मदत होईल - मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर-मुंबई जवळ येईल, उद्योग वाढतील, शेतकऱ्यांना मदत होईल. हा महत्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणारा आहे. या प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ यांनी आज ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. यावेळी नागपूर विमानतळ येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. हा गेमचेंजर प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर-मुंबई जवळ येईल, उद्योग वाढतील, शेतकऱ्यांना मदत होईल. हा महत्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणारा आहे. या प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या एका कार्यक्रमात “छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला” या विधानाबाबत बोलताना शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, हे सर्व जगाला माहित आहे, असे म्हणत लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे दुर्लक्ष केले.

हेही वाचा :

Back to top button