भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली का? संजय राऊत | पुढारी

भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली का? संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का, असा प्रश्न करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेह-यावर चिकटवलेल्या ‘त्या’ वादग्रस्त पोस्टरवरही बोट ठेवले आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटरवरून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. या टिप्पणीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यावर संयज राऊत यांना प्रश्न केले असता त्यांनी भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का, असा प्रतिप्रश्न करत त्यावर टीका केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कर्नाटकला का रे कधी करणार?

संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यावर देखील टीका केली. आमदार आशिष शेलार यांनी कर्नाटकच्या आरे ला आम्ही का रे ने उत्तर देणार, असे म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी कर्नाटक महाराष्ट्रात घुसले सुद्धा तुम्ही कधी का रे करणार, असा प्रश्न उपस्थित करत आता कर्नाटकला विरोधी पक्षच का रे करेल असे संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा :

extra weight : दहा किलो अतिरिक्त वजन घटवते तीन वर्षांचे आयुष्य

लंडनमध्ये वडापाव विकून मालामाल झाले दोन मित्र!

Back to top button