चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत | पुढारी

चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली असून, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उमेश गाडेकर (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे. उमेश गाडेकर याने घराजवळच असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. यामुळे अल्पवयीन मुलगी आठ महिन्याची गर्भवती राहिली. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.

दरम्यान, पीडितेच्या पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून उमेश गाडेकर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आगलावे करीत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button