रामदेव बाबा यांना अटक करुन जेलमध्ये टाका; प्रा. जोगेंद्र कवाडे यांची मागणी | पुढारी

रामदेव बाबा यांना अटक करुन जेलमध्ये टाका; प्रा. जोगेंद्र कवाडे यांची मागणी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामदेव बाबांना ताबडतोब अटक करून जेलमध्ये टाकावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. चंद्रपूर शहरातील स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पतंजलीच्या महिला महासंमेलनाला योगगुरू रामदेवबाबांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

महिलांबाबत वादग्रस्त वक्यव्य केल्यामुळे सरकारने त्यांना अटक करून जेलमध्ये टाकायला पाहिजे होत. ज्या छत्रपती शिवबांनी, महिलांचा सन्मान केला. त्या महाराष्ट्रात येवून रामदेव बाबा महिलांबाबत गलिच्छ, अभ्रद टिपणी करीत असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्राच्या सरकारनी रामदेवबाबाला अटक करून जेलमध्ये टाकायला पाहिजे होते. परंतु, कुणीही काही बोलतांना दिसत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय महिला आयोग व राज्य सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही प्रा. कवाडे यांनी केली.

ज्याप्रकारे रामदेवबाबांचा विरोध व्हायला पाहिजे, तसा विरोध होतांना दिसत नाही. तसेच महिला आयोगाने ज्याप्रमाणे कठोर भूमिका घ्यायला पाहिजे, तशी भूमिका घेत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. महिला संघटनांनी एकत्र येत रामदेवबाबा विरोधात तीव्र आंदोलन करायला हवे, असेही मत यावेळी त्यांनी मांडले. प्रा. जोगेंद्र कवाडे चंद्रपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला सक्षमीकरण मेळाव्याला आले असता चंद्रपूर विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत पत्रकांरांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश दुर्योधन, सुमेध मुरमाडकर, महिला जिल्हाध्यक्षा आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हेही वाचलंत का?

Back to top button