नागपूर: बनावट तंबाखू कारखान्यावर धाड; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नागपूर: बनावट तंबाखू कारखान्यावर धाड; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेचे सावनेर पथक पेट्रोलिंग करीत असताना नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी परिसरात एका बनावट तंबाखू कारखान्यावर धाड घातली. यामध्ये 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, वेलतूर शिवारातील शिवाजी रामचंद्र वाट यांचे शेतातील घरात हा बनावट तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू होता. अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याशी समन्वय साधून ही धाड कारवाई करण्यात आली. यावेळी 7.10 लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू, 9.11 लाख रुपयांचा खुला विना लेबलचा 347 किलो सुगंधित तंबाखु यासोबतच विविध साहित्य, पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशिन प्रत्येकी अंदाजे कींमत 60 हजार व पोते शिवण्याची शिलाई मशिन, रिकामे पाऊच असे सर्व साहित्य मिळून एकूण किंमत 18.93 लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

.हेही वाचा 

चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यात पट्टेदार वाघ जेरबंद; आवळगाव शेतशिवारात घेतला होता महिलेचा बळी

Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार

कराड : वनवासमाचीत शेतात आढळलेल्या एका पिल्लाला बिबट्या घेऊन गेला; दोन पिल्ले वनविभागाच्या ताब्यात सुरक्षित

 

Back to top button